Banner

मनोगत

सप्रेम जयजिनेंद्र !

‘परिणय’ चा उद्देश आणि मनोगत ‘परिणय परिचय मेळावा’ म्हणजे पाच संयोजीकांच्या मनापासून असलेल्या उत्कृष्ठ इच्छेचे हे फळच आहे जणू. कित्येक वर्षांच्या यशस्वी प्रवासाच्या अनुभव संपन्नतेमुळे मेळाव्याचे स्वरूप दिवसेंदिवस समृद्ध होत चालले आहे. परिणायचा मुख्य उद्देश म्हणजे परिणय घडवून आणणे. विवाह जुळण्यास अनुरूप मुलामुलींची भेट घडवून त्यांचे नवे जीवन सुरु करण्यास हातभार लावणे. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन संसार यशस्वीपणे व्हावा यासाठी प्रयत्न करणे, आपल्या जन्माबरोबरच आपला साथीदार कोण आहे हे नक्की असतेच पण तो अज्ञात असतो. त्याचा शोध घेण्याचा पुरुषार्थ करावाच लागतो. म्हणून युवक-युवतींना सहजीवनात पदार्पण करण्यासाठी त्यांच्या उत्सुक मनातील तरल रेशीम भावनांना प्रकट करण्याची संधी परिणय देत आहे. दोघांच्या भावना जाणून घेऊन सुदैवाने विवाहयोगजुळून आल्यास एक अनुरूप वधुवराची जोडी घराचे सौख्य व मागल्या वृद्धिंगत करते. असे सर्व मंगलमय व्हावे या भावनेने, सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्याची जपणूक करत परिणयचे आयोजन केले आहे. अत्यंत वैशिष्ठपूर्ण आयोजन, नियोजन व संयोजन यामुळे मागील अनेक मेळावे उत्तमरीतीने पार पडले आहेत. तसेच या वर्षीचा मेळावा हि आखीव , रेखीव व यशस्वी होईल, याची आम्हाला खात्री आहे.

“दोन वाती एकरूप होऊन निरांजनातील ज्योत तेवते |
परिणय मधील परिचयाने अनुरूप नाते उजळ होते |”

‘परिणय’ चा यशस्वी मेळावा दर वर्षीप्रमाणे आयोजित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या मेळाव्याद्वारे दर वर्षी अनेक विवाहयोग जुळून येतात यातच आम्हाला ख़ुशी आहे व यशाचे समाधान आहे.
- परिणय संचालिका


जयजिनेंद्र !

“हजारो मिल जाते हैं जिंदगी में…
लेकिन दिल का रिश्ता बडी मुश्किल से मिलता है…”


असा ' दिल का रिश्ता ' जुळवण्यासाठी आयोजित करीत आहोत गेली 11 वर्षे यशस्वीपणे आयोजित करीत असलेला व भरभरून प्रतिसाद मिळत असलेला परिणय वधुवर मेळावा,सोलापूर.
एकमेकांना जागीच बांधून ठेवणार्‍या कोरोना च्या या काळातही तुमच्याशी संवाद साधण्यास आम्हीं बांधील आहोत. “रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल...”
ही आशा बाळगत व उज्ज्वलआनंदाची ज्योत मनात तेवत ठेवत नक्की भेटू या ... परिणय मधे !!!!

Our Management Team

सौ. मेघा राजन गांधी

स्व. कांतीलाल आ. गांधी व श्री विजयाबाई यांची सून व स्व. श्री. किशोरकुमार मा. शहा (आळंदकर) यांची कन्या. प्रथम पासून धार्मिक व सामाजिक कार्याची आवड. या सर्व कार्यात पती श्री. राजन गांधी यांचे मोलाचे सहकार्य. श्री. कांतीलाल अ. गांधी,...Read More...

सौ.वासंती विजयकुमार कोठारी

श्री. पोपटलाल व स्व. सौ. ललिता कोठारी (उपळाईकर) यांच्या स्नुषा. आणि स्व.श्री रतनलाल व स्व. सौ. कमल शहा (मुंबई) यांची कन्या. मुंबई सारख्या महानगरीतून उपळाईसारख्या खेड्यात सगळ्याच गोष्टीशी जुळवून घेण्याचे मानसिक बळ ,...Read More...

डॉ. सुजाता प्रकाशचंद्र मेहता

स्व. श्री. प्रकाशचंद्र रा. मेहता (पंदारकर) व स्व. सौ. ललिताबाई यांच्या सुकन्या. शिक्षण एम.ए.बी.एड.पी.एच.डी., शिक्षण सरस्वती मंदिर, श्राविकाश्रम व दयानंद कॉलेज येथे झाले. हरीभाई देवकरण,...Read More...

सौ. संगिता अजितकुमार शहा

स्व. बाहुबली व श्रीमती छाया शहा (सावळेश्वरकर) यांची सुकन्या. स्व. सुभाष व श्रीमती प्रभावती शहा (इंडीकर) यांची स्नुषा. बारामती शहरात लहानपणापासूनच त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाले. लग्नानंतरही त्यांचे पती,...Read More...

सौ. निशा भरत गांधी

या सोलापूर येथील सुप्रसिध्द मोतीचंद रेवचंद गांधी घराण्यातील श्रीमती शामा (विमल) व स्व. जवाहिरलाल मोतीचंद गांधी यांच्या स्नुषा. करकंब निवासी स्व. शांतीकुमार गुलाबचंद शहा (मैंदर्गीकर) व श्रीमती शामा यांच्या या कन्या,...Read More...

Payment Mode